About Me

My photo

कोहम महोक हे नक्कीच माझे नाव नाहीये. हे असले नाव आणि आडनाव आपण कधीतरी ऐकले किंवा वाचले आहे काय? मी तरी ऐकलेले नाही. तर मित्रांनो हे माझे खरे नाव नाहीये. कोहम महोक ह्या नावाची जन्मकथा अशी आहे. एक आवडता संस्कृत श्लोक आहे - "देहम नाहम कोहम सोहम!" - म्हणजे मी हा देह नाही तर मी कोण आहे? तर मी तू (देव) आहे! आणि इंग्रजीत mahok हे koham चे palindrome आहे. मी लिहायला का लागलो? तर भांडारकर वरील भ्याड हल्ल्यानंतर नवमराठा लेखक व वक्त्यांचे ब्राम्हण जातीबद्दलचे शिवराळ विचार ऐकले, वाचले आणि एक लक्षात आले की मी ब्राम्हण असून हे लोक ब्राम्हणांची जी व्याख्या जगाला सांगत आहेत तो मी नव्हेच! तसेच मराठा लोकच दलितांवर अन्याय व अत्याचार करण्यात पण पुढे होते आणि सध्याही आहेत. त्यामुळे मला जे वाटले आणि ज्यावर विरोध दर्शवावा वाटला त्यावर मी लिखाण करणार आहे. त्तेव्हा भेटूया वरचेवर... Deham Naham Koham Soham - I am not the who is identified by this body, who am I, I am He (God).

Saturday, November 1, 2014

देवेंद्रची जात आणि गुण प्रामाणिकपणा आहे!

फेसबुकवर आज प्रकाशित केलेली एक पोस्ट इथे परत प्रकाशित करत आहे!
सुधारणा ह्या भ्रष्टाचार तुमच्या आमच्या कडून अश्या काढून घेतो.
आपल्याला हवे आहेत प्रामाणिक राजकारणी नेते!

==========================

देवेंद्रची जात आणि गुण प्रामाणिकपणा आहे!

========================== 

आपले विद्यमान मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी सौ. अमृता फडणवीस ह्या त्यांची बँकेमधील नोकरी सोडणार नाहीत. प्रामाणिक राजकारणी नवरा असताना घर चालवायला बाईंना नोकरी करणे भागच आहे. ह्या प्रामाणिकपणाला Koham Mahokचा सलाम! नाहीतर अजित पवारांची कोट्यावधी रुपयांची मालमत्ता पाच वर्षात म्हणे पाचपट झाली. तिकडे अविनाश भोसले बरोबर केलेली सेटिंग आणि लपवलेली बेनामी मालमत्ता (आठवा जिजाई, त्यांच्या निवा

भ्रष्ट राजकारण्यांची जागा जेलमध्ये आहे!
सस्थानाचा घोटाळा) वेगळीच, छग्गु भुजबळ म्हणे मुंबईत शासकीय निवासस्थान सोडून पाच माजली राजवाड्यात राहायला गेला. कोठून आला हो हा पैसा - उत्पन्नाचे दुसरे काहीही साधन नसताना, आणि पूर्णवेळ राजकारण करत असताना हे पवार भुजबळ एव्हढा अमाप पैसा कसा मिळवतात? आणि 'आपल्या' नव्या मुख्यमंत्र्याची बायको नोकरी का बरे सोडत नाही? लोकहो, नव्या मुख्यमंत्र्याची जात बघण्याऐवजी त्याच्या ह्या क्वालिटी बघा, आणि तो अजित, छ्ग्गुच्या मार्गाने जाणार नाही ह्याची काळजी घ्या. तो ब्राम्हण आहे म्हणून त्याला विरोध करू नका,शेवटी तो तुमच्या आमच्यासारखा मध्यमवर्गीय आहे, आणि देवेंद्रला अजित, छ्ग्गुला तुरुंगात टाकण्यासाठी बळ द्या! लक्ष्यात असू द्या सौ अमृताने नोकरी सोडलेली नाही, आणि सौ सुनेत्रा पवार ह्या पद्मसिंह पाटील नावाच्या सरंजामी गावगुंडाच्या बहिण आहेत. सौ. सुनेत्राबाईंचे पाय कधी मर्सिडीज, बीएमडब्लू शिवाय घराबाहेर पडलेले नाहीत, तर सौ अमृता ह्या म्हणे पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरायच्या आणि जुन्या स्कूटरने प्रवास करायच्या. आणि छग्गुने खाल्लेल्या पैशाने इंडोनेशियात मुलगा पुतण्याच्या नावाने खाणी विकत घेतलेल्या आहेत.
परत सांगतो, श्री पवार, श्री भुजबळ यांना तुरुंगात टाकायला देवेंद्रला बळ द्या, कारण तो तुमच्याआमच्यातला आहे आणि त्याची जात प्रामाणिकपणा आहे!
- कोहम महोक

Thursday, September 4, 2014

भारताने धर्मनीरपेक्ष जरूर असावे परंतु …

==========================
भारताने धर्मनीरपेक्ष जरूर असावे परंतु …
==========================
 
व्हाॅल्टेयरची स्वातंत्र्य, समता आणि लोकशाही ह्याबाबतीत आपल्याला एक देणगीच आहे. सर्वसाधारणपणे आजोबाना आधुनिक लोकशाहीचे 'एक' जनक म्हणता येईल. 
त्याने अतिशय प्रभावीपणे भाषणस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य, धर्मस्वातंत्र्य ह्याचे महत्व विशद केले आहे. I do not agree with what you have to say, but I'll defend to the death your right to say it. म्हणजे "मला तुझे मत एकवेळ पटत नसेल, परंतु मी तुझे मत व्यक्त करण्याच्या स्वातंत्र्याचे मरेपर्यंत रक्षण करीन." हा झाला आदर्शवाद! ही व्हाॅल्टेयर आजोबा atheist म्हणजे निधर्मवाडी होता. त्याचे ह्यासंदर्भातले अजून काही उद्गार बघुयात:
१. Faith consists in believing when it is beyond the power of reason to believe. - (देवावेरील) विश्वासाचा साचा कल्पनेच्या पलीकडचे वास्तवापलीकडच्यावर विश्वास ठेवण्यात आहे. (माझ्या मराठी भाषांतराची लिमिटेशन्स उघडी पडतायेत)
२. Of all religions, the Christian should of course inspire the most tolerance, but until now Christians have been the most intolerant of all men. - सर्व धर्मात ख्रिश्चन धर्म (दयेचा आणि शांततेचा धर्म असल्यामुळे) धार्मिक सहिष्णुता प्रस्तुत करण्यात सगळ्यात पुढे हवा आहे, परंतु ख्रिश्चन धर्मियांनी इतिहासात अतिशय क्रूर असहिष्णु कृत्ये केलेली आहेत. 
आजोबा महान तर होतेच परंतु त्यांचे विचार अतिशय समर्पक आणि आदर्शवादी होते. त्यांचा कार्यकाल साधारण पणे पहिला बाजीराव सत्तेत असतानाचा होता. १६८९ साली संभाजी महाराजांचा धर्मद्वेष्ट्या औरंगजेबाने वध केला आणि पाच वर्षांनी १६९४ साली व्हाॅल्टेयरचा जन्म झाला. म्हणजे भारतात धर्मांध बादशाहांच्या चलतीला आळा बसत असतानाच व्हाॅल्टेयरचे जगात आगमन झाले. व्हाॅल्टेयर आजोबा धन्यच होते, त्यांचे काम, लेख, पुस्तके, विचारसारणीचा ह्या जन्मी अभ्यास करण्याचा योग येवो ही इच्छा. 
अर्थात, माझ्या लेखाचे प्रयोजन दुसरेच आहे. काल आयमन अल जवाहिरीने हिंदुस्तानात अल कायदाचे जाळे पसरविण्याचा निर्णय घेतलेला आहे. इंडियन मुजाहिदीन, लष्करे तोयबा सारख्या दहशतवादी संघटनांचे जाळे आधीच भारतात वेगाने पसरतेय. बॉम्ब स्फोट, धार्मिक दंगली नित्याच्या होत आहेत. आणि हे धार्मिक मुलतत्ववादाला खतपाणी आणि अगदी योग्य वातावरण आहे. भारताने ह्या परीस्थित काय करावे? व्हाॅल्टेयर सारखे मरेपर्यंत धर्मनिरपेक्ष राहण्याचा चंग बाळगावा की ह्या मुलतत्ववादाचा कठोरतेने मुकाबला करावा? 
 
 
 
कोहमचा हिशोब==========
भारतात सुमारे १५ कोटी मुसलमान आहेत आणि त्यातले सुमारे १३ कोटी सुन्नी आहेत, बाकीचे शिया आहेत. ह्या १३ कोटीपैकी साधारण १०-१५ टक्के मुसलमान हे कडव्या (अतिरेकी नव्हे) विचारसरणीचे आहेत असे संशोधन प्रसिद्ध झालेले आहे. १३ कोटीचे १० टक्के होतात, १.३ कोटी मुसलमान जे कट्टर आहेत. हिशोबाच्या सोयीसाठी एक कोटी संख्या धरुयात - ह्या पैकी एक चतुर्थांश जरी अतिरेकी संघटनाकडे आकृष्ट झाले तर त्यांची संख्या होते २५ लाख. २५ लाख अतिरेकी १३ कोटी मुसलमान लोकांच्या आड लपून खूपच त्रास देऊ शकतात ह्याचे आपण भान विसरता काम नये. आपल्याला पाकिस्तानकडून असलेला धोका, बांगलादेशी मुसलमानांची चाललेली घाऊक आवक, आणि मतपेट्याचा सोयीसाठी पुरोगामी शरद पवारांची (अतिरेक्यांच्या बरोबर संबंध असलेली आणि मारली गेलेली) इशरत जहानला चांगली मुलगी दाखवण्याचा चंग, हे सगळेच प्रकार आपल्या समोर घड्तायेतच. 
मुसलमान समाज हा सुद्धा ह्यातून काहीही शिकत नाही. ह्या समाजात शिक्षणाचे प्रमाण अगदी कमी आहे. आणि सम्यक, सहिष्णू विचार ह्या धर्मात आणि ह्या धर्मातील नेत्यात नाहीतच. हमीद दलवाई, सय्यदभाई ह्यांना सुद्धा ह्या समाजाने कधीच स्वीकारले नाही. अर्थात, हमीद अथवा सय्यदला, मुसलमान धर्मावर टीका करताना त्याचबरोबर हिदु धर्मावर पण टीका करावी लागते. अर्थात त्यांनी प्रयत्न तरी केला नाहीतर ह्या समाजाचे नेतृत्व अगदीच अडाणी मुल्ल्यांच्याकडे आहे. तस्लिमा नसरीन, सलमान रश्दी यांनी फक्त अतिरेकी इस्लामी धर्मभावनेबद्दल टीका केली म्हणून त्यांच्या विरुद्ध हत्येचा फतवा निघालेला आहे.
इथे व्हाॅल्टेयरचा पराभव झालेला आहे. मी तुझ्या विचारांचा आदर करतो, ते व्यक्त करण्याच्या स्वातंत्र्याचे रक्षण करतो, पण ते अतिरेकी विचार असतील, ह्याला मारा, त्याला काप असले विचार असतील तर काय करायचे हो व्हाॅल्टेयर आजोबा?
जिथे जिथे हा मुस्लिम समाज बहुसंख्य आहे तिथे तिथे अल्पसंख्यांक धर्मांचे हक्क हिरावलेले दिसतात. उदा. पाकिस्तान, काश्मीर आणि बांगलादेश. जिथे जिथे ते अल्पसंख्य आहेत तिथे त्यांची अमच्यावर फारच अन्याय चालू आहे अशी ओरड चालू असते. उदा भारत. आत्तापर्यंत भारताचे वाजपेयी सरकार सोडले तर इतर सर्व सरकारे अल्पसंख्यांक लांगुलचालन करणारे होते. तरीही भारतात मुसलमानांच्यावर फार अन्याय चालू आहेत अशी ओरड सतत चालू असते. 
जगभर मुसलमान आणि इस्लाम चे इतर सर्व धर्मांशी हिंसक संबंध आहेत - ख्रिश्चन, ज्यू, बौद्ध, हिंदू, जैन, शीख, शिया, एथिस्ट. सगळ्यांशी वाकडे असणारा हा धर्म कसा बरोबर असू शकतो? हिंसेवर श्रद्धा ठेवणारा धर्म शांततेचा धर्म कसा काय असू शकतो? प्रत्येक गोष्टीचा निर्णय हा हिंसाचारानेच झाला पाहिजे असे मानणारा हा धर्म भारतीय पुरोगामी लोकांच्या गळ्यातला ताईत कसा काय असू शकतो? 
 
 
 
ह्या धर्माची शिकवण पहा: माझ्यावर विश्वास न ठेवणाऱ्या लोकांना ते जिथे दिसतील तिथे गाठून ठार मार (कुराण २:१९१ - १९३) किंवा माझ्याविरुद्ध बोलणाऱ्या माझ्यावर विश्वास नसणाऱ्या व्यक्तीला मारा, त्याचे विरुद्ध हात आणि पाय कापा, त्याला तुरुंगात डांबा (कुराण ५:३३) - ही असली शिकवण. अशी हिंसक शिकवण देणाऱ्याला देव तरी कसे म्हणायचे हाच प्रश्न आहे, खरेतर मुसलमानांचा हा देव स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडणारा, आणि स्वतःला असुरक्षित मानणारा देव वाटतो. परत धर्माच्या नावावर हिंसा करून (जिहाद - माय फुट) स्वर्गात आल्यावर त्याला ७२ का ७८ कुमारिका भोगायला देणाऱ्या देवाला मी तरी मानायला तयार नाही! असल्या घाणेरड्या स्वर्गात राहण्याचा तरी काय उपयोग? 
इथे उर्वरित कट्टर नसलेला मुसलमान समाज मागे पडतो, ते कधीच ठामपणे ह्या कट्टरवादी मुल्यांचा आणि मुल्ल्यान्चा निषेध करताना दिसत नाहीत. 


आपण काय करावे?============
मुसलमान कट्टरपंथीयांच्या विरुद्ध आपण इस्राइल, अमेरिका आणि रशियाने जशी अतिशय कडक भूमिका घेतली आहे तशीच भूमिका घेतली पाहिजे. 
१. भारताच्या बॉर्डर सील कराव्यात. उंदराला सुद्धा सीमा क्रॉस करायला कष्ट पडले पाहिजेत. 
२. इस्राइलशी करार करून भारतीय कमांडोना अतिरेकीविरोधी प्रशिक्षण दिले पाहिजे. आणि प्रत्येक संवेदनशील शहरात अतिरेकी विरोधी कमांडो पथक उभारले पाहिजे. त्यांच्याकडे आधुनिक शस्त्रे, हेलोकोप्टर वगैरे तैनातीत असावेत. 
३. ९० टक्के मुसलमानाना सम्यक वृत्ती शिकवावी. त्यांच्यात अतिरेक्यांच्या विरुद्ध बोलण्याची शक्ती पैदा करावी. शरद पवारांचे ह्या कामात सहकार्य घ्यावे. त्यांचे आणि जितेंद्र आव्हाडांचे मुसलमान समाजात चांगले वजन आहे. 
४. जिथे जिथे दहशतवादी दिसेल तिथे तिथे त्यांना ठेचून काढण्याच्या ऑर्डर दिल्या पाहिजेत. 
५. गुप्तहेरांचे जाळे भारतभर पसरावे. ९० टक्के मुसलमान समाजाकडून ह्याबाबतीत सहकार्य घ्यावे. 
६. टार्गेटेड किलिंग करण्यासाठी इस्राइल सारखी आणि अमेरिकेच्या सील टीम सारखी फौजी टीम उभारावी. 

सारांश
====
व्हाॅल्टेयर काहीही म्हणो, पण आपण स्वसंरक्षणाची काळजी घेतली पाहिजे. जरी मुसलमान व्होट बँकेसाठी ठीक आहेत असे वाटत असेल तर गेल्या निवडणुकीत हिंदू समाजाने व्होट बँक म्हणजे काय असते ते दाखवून दिले आहे. मोदी सरकारने त्यांच्यावरची जबाबदारी ओळखून कडक पाउले उचलावीत आणि बहुसंख्य समाज त्यांच्याबरोबर राहील!
अमेरिका आणि इस्राइल ह्यांच्याशी सहकार्याचा करार केला पाहिजे. व्हाॅल्टेयर खूप पूर्वी होऊन गेला, जर तो आज असता तर कदाचित त्याने स्वतःच्या मतात बदल केला असता. 
I do not agree with what you have to say, but I'll defend to the death your right to say it -  "as long as you are tolerant to other points of view and are not violent". म्हणजे "मला तुझे मत एकवेळ पटत नसेल, परंतु मी तुझे मत व्यक्त करण्याच्या स्वातंत्र्याचे मरेपर्यंत रक्षण करीन, जोवर तू दुसऱ्यांच्या विचाराचा आदर करशील आणि हिंसा करणे सोडशील".
Koham Mahok
Sept 4, 2014

Saturday, August 23, 2014

बाबा आढाव आणि भाई वैद्य, तुम्ही सुद्धा!

शेवटी एकदाचा लिंगपिसाट खेडेकरचा सत्कार रद्द झाला. माझ्या अंतरआत्म्यास शांती लाभली. 

ह्या ब्राम्हणद्वेषी आणि हिडीस खेडेकरच्या सत्कारास कोण कोण उपस्थित राहणार होते माहितेय का? जाणते राजे शरद पवार, ज्यांनी ह्याला तुरुंगात टाकायला पाहिजे हवे ते आर आर आबा पाटील, भाई वैद्य, आणि बाबा आढाव. पहिली दोन नावे गलिच्छ राजकारण्यांची आहेत 

परंतु भाई वैद्य? ही कसली पुरोगामी कम्पलशन्स की हा 'ब्राम्हण जातीत जन्माला आलेल्या' भाईला एव्हढा गिल्टी कॉम्प्लेक्स का बरे आलेला आहे? ब्राम्हणांच्या स्त्रिया मराठ्यांशी संबंध ठेवतात, अंतरवस्त्रे वापरत नाहीत, ब्राम्हण पुरुषांची हत्या करावी ह्याच्याशी भाई सहमत? 

दुसरे बाबा आढाव! हमाल पंचायत, अनिल अवचट आश्याबरोबर काम करणारा आणि सर्वत्र सभ्य म्हणून ओळखल्या जात असणाऱ्या ह्या इसमाने स्वताची योग्यता दाखविली. बाबा, डॉ. अनिलची पत्नी डॉ. सुनंदा ह्या पण खेडेकरच्या पुस्तकातील ब्राम्हण स्त्रीच्या गुणाच्या का हो? बाबा आणि भाई , तुम्हाला खरोखरीच लाज वाटायला हवी की अश्या हीन दर्जाच्या माणसाच्या सत्काराला तुम्ही हातभार लावणार. अर्थात, तुम्ही पुरोगामी आणि तुम्ही चूक कधीच असणार नाही, चूक कधीही मान्य करणार नाही. 

शरद पवार पंतप्रधान न झाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना, भाई वैद्य आणि बाबा आढाव नावाच्या हीन दर्जाच्या पुरोगाम्यांचा तीव्र निषेध!