About Me

My photo

कोहम महोक हे नक्कीच माझे नाव नाहीये. हे असले नाव आणि आडनाव आपण कधीतरी ऐकले किंवा वाचले आहे काय? मी तरी ऐकलेले नाही. तर मित्रांनो हे माझे खरे नाव नाहीये. कोहम महोक ह्या नावाची जन्मकथा अशी आहे. एक आवडता संस्कृत श्लोक आहे - "देहम नाहम कोहम सोहम!" - म्हणजे मी हा देह नाही तर मी कोण आहे? तर मी तू (देव) आहे! आणि इंग्रजीत mahok हे koham चे palindrome आहे. मी लिहायला का लागलो? तर भांडारकर वरील भ्याड हल्ल्यानंतर नवमराठा लेखक व वक्त्यांचे ब्राम्हण जातीबद्दलचे शिवराळ विचार ऐकले, वाचले आणि एक लक्षात आले की मी ब्राम्हण असून हे लोक ब्राम्हणांची जी व्याख्या जगाला सांगत आहेत तो मी नव्हेच! तसेच मराठा लोकच दलितांवर अन्याय व अत्याचार करण्यात पण पुढे होते आणि सध्याही आहेत. त्यामुळे मला जे वाटले आणि ज्यावर विरोध दर्शवावा वाटला त्यावर मी लिखाण करणार आहे. त्तेव्हा भेटूया वरचेवर... Deham Naham Koham Soham - I am not the who is identified by this body, who am I, I am He (God).

Saturday, November 1, 2014

देवेंद्रची जात आणि गुण प्रामाणिकपणा आहे!

फेसबुकवर आज प्रकाशित केलेली एक पोस्ट इथे परत प्रकाशित करत आहे!
सुधारणा ह्या भ्रष्टाचार तुमच्या आमच्या कडून अश्या काढून घेतो.
आपल्याला हवे आहेत प्रामाणिक राजकारणी नेते!

==========================

देवेंद्रची जात आणि गुण प्रामाणिकपणा आहे!

========================== 

आपले विद्यमान मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी सौ. अमृता फडणवीस ह्या त्यांची बँकेमधील नोकरी सोडणार नाहीत. प्रामाणिक राजकारणी नवरा असताना घर चालवायला बाईंना नोकरी करणे भागच आहे. ह्या प्रामाणिकपणाला Koham Mahokचा सलाम! नाहीतर अजित पवारांची कोट्यावधी रुपयांची मालमत्ता पाच वर्षात म्हणे पाचपट झाली. तिकडे अविनाश भोसले बरोबर केलेली सेटिंग आणि लपवलेली बेनामी मालमत्ता (आठवा जिजाई, त्यांच्या निवा

भ्रष्ट राजकारण्यांची जागा जेलमध्ये आहे!
सस्थानाचा घोटाळा) वेगळीच, छग्गु भुजबळ म्हणे मुंबईत शासकीय निवासस्थान सोडून पाच माजली राजवाड्यात राहायला गेला. कोठून आला हो हा पैसा - उत्पन्नाचे दुसरे काहीही साधन नसताना, आणि पूर्णवेळ राजकारण करत असताना हे पवार भुजबळ एव्हढा अमाप पैसा कसा मिळवतात? आणि 'आपल्या' नव्या मुख्यमंत्र्याची बायको नोकरी का बरे सोडत नाही? लोकहो, नव्या मुख्यमंत्र्याची जात बघण्याऐवजी त्याच्या ह्या क्वालिटी बघा, आणि तो अजित, छ्ग्गुच्या मार्गाने जाणार नाही ह्याची काळजी घ्या. तो ब्राम्हण आहे म्हणून त्याला विरोध करू नका,शेवटी तो तुमच्या आमच्यासारखा मध्यमवर्गीय आहे, आणि देवेंद्रला अजित, छ्ग्गुला तुरुंगात टाकण्यासाठी बळ द्या! लक्ष्यात असू द्या सौ अमृताने नोकरी सोडलेली नाही, आणि सौ सुनेत्रा पवार ह्या पद्मसिंह पाटील नावाच्या सरंजामी गावगुंडाच्या बहिण आहेत. सौ. सुनेत्राबाईंचे पाय कधी मर्सिडीज, बीएमडब्लू शिवाय घराबाहेर पडलेले नाहीत, तर सौ अमृता ह्या म्हणे पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरायच्या आणि जुन्या स्कूटरने प्रवास करायच्या. आणि छग्गुने खाल्लेल्या पैशाने इंडोनेशियात मुलगा पुतण्याच्या नावाने खाणी विकत घेतलेल्या आहेत.
परत सांगतो, श्री पवार, श्री भुजबळ यांना तुरुंगात टाकायला देवेंद्रला बळ द्या, कारण तो तुमच्याआमच्यातला आहे आणि त्याची जात प्रामाणिकपणा आहे!
- कोहम महोक

1 comment:

  1. भ्रष्टाचार करणाऱ्या सर्वांना शिक्षा झालीच पाहिजे

    ReplyDelete